Pavsalyatil Ek Divas Marathi Nibandh | पावसातील एक दिवस मराठी निबंध
पावसाळ्यातील एक दिवस पावसाळा आला की सर्वत्र आनंदाची लहर उठते. आकाशात काळे ढग जमा होतात आणि पावसाच्या सरी येऊ लागतात. एके दिवशी सकाळी उठल्यावर खिडकीतून पावसाचे थेंब पडताना पाहिले. गार वारा आणि पावसाची सर मला खेळायला बाहेर बोलवत होती. झाडांची पानं ताजीतवानी झाली होती, रस्त्यांवरचे धूळ पाण्याने वाहून गेले होते
शाळेत जाताना रस्त्यावर लहान मुलं पावसात खेळताना दिसली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझं मनही आनंदाने भरून आलं. शाळेत पोहोचल्यावर पावसाळी गाण्यांचा कार्यक्रम होता. सर्वजण आनंदाने गाणी गात होते आणि पावसाच्या सरींमध्ये नाचत होते. वर्गात खिडकीतून बाहेर बघत पावसाच्या सरींचा आनंद घेत होतो
शाळा सुटल्यानंतर मित्रांबरोबर पावसात खेळलो, मातीच्या गंधाने मन प्रफुल्लित झाले. पाय घसरून पडणे, चिखलात उडया मारणे, हे सगळं खूप मजेदार होतं. घरी आल्यावर आईने गरम गरम भजी केली. पावसाच्या थंड वातावरणात गरम चहा आणि भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो
त्या रात्री पावसाचा आवाज ऐकत झोपलो. पावसाळ्यातील दिवस नेहमीच आनंदी आणि स्मरणीय असतात. असे दिवस मनातल्या कोपऱ्यात कायमचे घर करून राहता.
Also read: சுதந்திர தினம் பேச்சு போட்டி 2024
Also read: Essay on Lakshadweep For Students & Children's
Also read: India On Moon Essay in Hindi for Students
Also read: Essay On Garbage Free India in English
Also read: Matdan Jan Jagruti Nibandh Marathi
THANK YOU SO MUCH
Comments
Post a Comment